Majhi Ladki Bahin Yojana 2024 [Updated]: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नवीन बदल

Majhi Ladki Bahin Yojana 2024 : महाराष्ट्र शासन यांची माझी लाडकी बहीण योजना 2024 हि दि. 01 जुलै 2024 पासून सुरु करण्यात आली असून आज दि. 02 जुलै रोजी महत्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे. लाडकी बहीण योजना सुरु करण्याचा उद्देश हा महिलांच्या आर्थिक, आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे होय. माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा सेतू सुविधा केंद्र मध्ये भरण्यात येतील.

महिला व बाल विकास विभाग यांचा शासन निर्णय क्रमांक 202406281814018230 दि. २८ जून, २०२४ असा असून या लेखात पुढे देण्यात आलेला आहे. तसेच आता नवीन बदलांनुसार उत्पन्न दाखला व महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र आवश्यक नाही.

Majhi Ladki Bahin Yojana 2024: नवीन शासन निर्णय व पात्रता

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्वपूर्ण बदल दि. ०२ जुलै रोजी करण्यात आला आहे. यात नवीन पात्रता व मुदतवाढ ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत करणे समाविष्ठ आहे. आता पात्र महिला लाभार्थी दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज सादर करू शकतात. तसेच एका परिवारामध्ये एक अविवाहित महिला देखील अर्ज करू शकते. तसेच नवीन शासन निर्णय नुसार खालील बदल हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये करण्यात आलेले आहेत.

  • सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि. १ जुलै, २०२४ ते १५ जुलै, २०२४ पर्यंत ठेवण्यात आली होती यात सुधारणा करून आता सदर मुदत २ महिने म्हणजेच दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत करण्यात आली असून लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच पात्र लाभार्थी महिलांना दि.०१ जुलै, २०२४ पासून दर माह रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येईल.
  • या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र (Domicile) आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. परंतु आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे खालील ४ पैकी कोणतेही  ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.
  1. रेशन कार्ड
  2. मतदार ओळखपत्र
  3. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
  4. जन्म दाखला
  • सदर योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
  • सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष होता आता त्या ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात आला आहे.
  • परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे खालील प्रमाणपत्र ग्राह्य धरण्य येईल.
  1. जन्म दाखला
  2. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
  3. आधिवास प्रमाणपत्र
  • २.५ लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला ची आवश्यकता नाही.
  • सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

(Majhi Ladki Bahin Yojana 2024 [Updated] Resource: MAHARASHTRA DGIPR @MahaDGIPR on X)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 महत्व

महाराष्ट्र राज्यात महिलांमध्ये अॅनिमियाचे प्रमाणे ५० पेक्षा जास्त आहे व राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी ५९.१० टक्के व स्त्रीयांची टक्केवारी २८.७० टक्के इतकी असून ही वस्तुस्थिती लक्षात घेता, महिलांच्या आर्थिक, आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्यामुळे माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात येत आहे.

महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत.

महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

  • वय 21 ते 65 वर्षे असणे आवश्यक
  • पात्र महिला लाभार्थीस दरमहा 1500 रुपये मिळणार
  • दरवर्षी शासन 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार
  • योजनेची अंमलबजावणी 1 जुलै 2024 पासून झाली असून शेवटची तारीख ३१ ऑगस्ट 2024 अशी आहे.

इतर योजना: Mahabocw Registration 2024 | बांधकाम मजूर नोंदणी असा करावा ऑनलाईन अर्ज..!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • महाराष्ट्र रहिवासी / रेशन कार्ड / मतदार ओळखपत्र / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्म दाखला
  • रु.2.50 लाखापेक्षा कमी असलेला उत्पन्न दाखला / लाल किंवा पिवळे रेशन कार्ड.
  • आधारकार्ड
  • बँक पासबुक
  • फोटो
  • अर्ज भरताना लाभार्थी महिला स्वतः उपस्थित असणे आवश्यक

या योजनेसाठी आपत्र कोण असणार  

  • 2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे अपात्र
  • लाभार्थ्याच्या कुटुंबामध्ये कोणी करदाता (Tax) अदा करत असेल तर अपात्र
  • कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर अपात्र
  • कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून ) अपात्र
Majhi Ladki Bahin Yojana 2024

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश

  • राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे.
  • त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. (३) राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे. (४) राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे.
  • महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा.

Majhi Ladki Bahin Yojana Apply Online: महत्वाच्या लिंक

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता पात्र लाभार्थी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज सादर करू शकतात. तसेच आपल्या नजीकच्या सेतू सुविधा केंद्र व अंगणवाडी केंद्रामध्ये मोफत अर्ज भरण्याची सुविधा महाराष्ट्र शासनाने केली आहे.

तसेच आपण Narishakti Doot Android App द्वारे देखील अर्ज सादर करू शकतात याची नोंद घ्यावी.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय येथे पहा
योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन (लवकरच पोर्टल उपलब्ध )
ऑफलाईन अर्ज येथे पहा
Narishakti Doot App
योजनेकरिता अधिकृत संकेतस्थळ लवकरच उपलब्ध होईल
Majhi Ladki Bahin Yojana 2024

Majhi Ladki Bahin Yojana Apply Online: योजनेचे वेळापत्रक

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज भरण्यास सुरुवातदि. ०१ जुलै २०२४
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शेवटची तारीखदि. ३१ ऑगस्ट २०२४

3 thoughts on “Majhi Ladki Bahin Yojana 2024 [Updated]: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नवीन बदल”

  1. Pingback: Shilai Machine Yojana Maharashtra 2024: शिलाई मशीन योजना महाराष्ट्र | १५ हजाराचे साहित्य मोफत मिळणार..! - Govt Scheme 2024

  2. Pingback: Mahabocw Registration 2024 | बांधकाम मजूर नोंदणी असा करावा ऑनलाईन अर्ज..! - Govt Scheme 2024

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top