Kisan Credit Card Loan Application 2024: पी एम किसान कर्ज योजनेमध्ये किसान क्रेडिट कार्ड (KCC) धारक शेतकऱ्यांना कोणतेही तारण न देता कर्ज मिळणार ते ही सरकारी अनुदानासह मिळेल. किसान क्रेडिट कार्ड मार्फत शेतकरी त्यांना हव्या असणाऱ्या कृषी आवश्यकतेनुसार किंवा त्यांच्या शेतीसाठी लागत असलेल्या गरजांसाठी अत्यंत स्वस्तात व कमी व्याजदरात कर्ज घेऊ शकतील. किसान क्रेडिट कार्ड मध्ये मिळणारे कर्ज हे विशेष सवलतीच्या व्याजादरावर दिले जातेय आणि जे शेतकरी या कर्ज घेऊन वेळेवर व नियमानुसार परतफेड करतात त्यांना विशेष सवलत मिळते.
PM Kisan Credit Card Benefits
किसान क्रेडिट कार्ड फायदे:
- किसान क्रेडिट कार्ड योजना ही फक्त शेतकऱ्यांसाठी आहे.
- त्यांना शेतीच्या कामांसाठी आर्थिक मदत लागली तर ते सहज कर्ज घेऊ शकतात.
- त्यामध्ये कर्ज घेऊन शेतकरी बी-बियाणे, खते व कीटक नाशके किंवा शेतीसाठी ची आवश्यक उपकरणे खरेदी करू शकतात.
- या क्रेडिट कार्डद्वारे शेतकरी कोणतेही तारण किंवा हमी शिवाय 1.6 लाख रुपयांचे कर्ज घेऊ शकतो.
- किसान क्रेडिट कार्ड योजना 2024 अंतर्गत शेतकरी तीन वर्षामध्ये रु. 5 लाख पर्यंत कर्ज घेऊ शकतात.
- किसान क्रेडिट कार्ड ची वैधता ही 05 वर्षे असते.
- या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 9 % व्याजदराने कर्ज मिळते व भारत सरकार त्यामध्ये 2 % व्याजदर अनुदान देते. असे ग्राह्य धरून मुळ 7 % व्याजदर होते.
- जर शेतकरी वेळेवर कर्जाची परतफेड करू शकला नाही तर त्यांना व्याजदरामध्ये 3 % आणखी सूट दिली जाते.
- एकंदरीत, अशाप्रकारे योजनेचा फायदा होत कर्जावर 4 % व्याज भरावे लागते.
- शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या आपत्तीं विरूद्ध पीक विमा संरक्षण सुद्धा दिले जाऊ शकते.
- शेतकऱ्याला कायमचे अपंगत्व, मृत्यू, किंवा इतर जोखीम झाल्यास त्यावर विमा संरक्षण देखील जाऊ शकते.
PMKisan Credit Card Apply Process | किसान क्रेडिट कार्ड अर्ज कसा करावा?
Step 1: प्रथम आपण PM Kisan या अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन किसान क्रेडिट कार्ड चा अर्ज डाउनलोड करावा. किंवा आपण ह्या लेखात दिलेल्या किसान क्रेडिट कार्ड अर्ज लिंक वरून डाउनलोड करा.
Step 2: अर्जामध्ये आपण आपली माहिती, कर्जाची रक्कम, थकीत असलेले कर्ज तपशील (असल्यास), व आपल्या शेती संबंधी माहिती भरावी.
Step 3: अर्ज भरून आपण बँक मध्ये जमा करावा. शक्यतो आपण PM Kisan चे पैसे ज्या बँकेत जमा होत असतील त्याच बँकेची निवड करावी.
Step 4: अर्ज जमा केल्यानंतर आपल्याला किसान क्रेडिट कार्ड बँकेत किंवा पोस्टाद्वारे मिळेल.
आपण आपले सरकार सेवा केंद्रामार्फत ऑनलाईन अर्ज सादर करू शकता त्या करिता आपल्या नजीकच्या CSC Center शी संपर्क करावा.
Kisan Credit Card 2024 Loan: आवश्यक कागदपत्रे
अर्जासोबत आपण खालील कागदपत्रे जमा करावीत.
- ओळखपत्र (आधार कार्ड / Pancard ई.)
- रहिवासी प्रमाणपत्र (रेशन कार्ड / रहिवासी दाखला ई.)
- जमिनीचा तपशील (7/12 व 8 अ उतारा)
- बँक पासबुक प्रत.
Kisan Credit Card Loan Application 2024: महत्वाच्या लिंक्स
Kisan Credit Card Loan Application 2024 | Click Here |
PM Kisan Credit Card Apply Bank: कोणत्या बँकेत आपण KCC साठी अर्ज करावा
State Bank of India Kisan Credit Card Apply Online: बरेच शेतकरी स्टेट बँक ऑफ इंडिया किसान क्रेडिट कार्ड घेणे पसंत करतात. कारण SBI किसान क्रेडिट कार्ड चा व्याजदर 3 लक्ष रु. पर्यंतच्या कर्जावर हा 2 % प्रति वर्ष पासून सुरू होतो.
Punjab National Bank: PNB KCC Card, किसान क्रेडिट कार्ड ची अर्ज प्रक्रिया हि सहज व सोपी आहे त्यामुळे अर्ज लवकर मंजुर होण्याची अपेक्षा असते.
HDFC Bank: ही बँक खासगी बँकांपैकी एक आहे व त्यांच्या कर्जावरील व्याज दर सुमारे 9.00% आहे आणि कमाल क्रेडिट मर्यादा रु. 3 लक्ष्य व त्या पर्यंत कर्जासह चेकबुक मिळू शकते. जर एखाद्या शेतकऱ्याचे पीक अपयशी ठरले तर त्यांना 4 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कर्जाची मुदतवाढ मिळू शकते. कर्ज निधीचा वापर करून पिकवलेल्या पिकांचा नैसर्गिक आपत्ती किंवा कीटकांच्या हल्ल्यांपासून विमाही काढला जातो.
Axis Bank: एक्सिस बँक किसान क्रेडिट कार्ड कर्जांवर 8.85 % व्याज दर आकारला जातो.
Conclusion: अश्या भारतातील अनेक सरकारी व खाजगी बँकांमध्ये आपण KCC साठी अर्ज करू शकता व बँक नुसार त्याचे लाभ थोडेफार वेगळे असू शकतात. कर्ज धारकांनी वेळीच त्याचे उपयोग, फायदे व अटी शर्ती यांचा अभ्यास करूनच अर्ज करावेत.
(Information Source: PM Kisan Portal, SBI KCC)
FAQ
किसान क्रेडिट कार्ड (KCC) कर्ज व्याज दर किती आहे?
शेतकरी कर्ज योजनेचा व्याजदर हा बँकेद्वारे ठरवला जातो व तो शेतकऱ्याचा पूर्वीचा क्रेडिट इतिहास, शेतीखालील क्षेत्र, लागवडीखालील पीक ई. अनेक माहितीवर अवलंबून असतो. परंतु, त्यावर रिझर्व बँक कमाल व्याज दरावर नियंत्रण ठेवते.
More Govt Scheme
- Cidco Mass Housing Lottery 2024 Apply Online: महागृहनिर्माण योजना जानेवारी २०२४
- PM Kusum Yojana Maharashtra 2024: महाऊर्जा कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र 2024
- अपंग ई वाहन योजना महाराष्ट्र | e Vehicle Form MSHFDC | Handicap Govt Scheme Maharashtra 2023
- Maharashtra Lek Ladaki Yojana: मुलींना लखपती बनवणारी महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023
- PM Kusum Yojana Maharashtra 2024: महाऊर्जा कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र 2024
- PM Vishwakarma Scheme 2023: प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना
- MHADA Lottery Scheme 2024: म्हाडा ची लॉटरी सोडत आता 26 जानेवारी नंतरच…!
- PM Suryodaya Scheme 2024: प्रधानमंत्री सूर्योदय योजना | एक कोटी घरांवर सौर यंत्रणेची घोषणा
Pingback: अपंग ई वाहन योजना महाराष्ट्र | e Vehicle Form MSHFDC | Handicap Govt Scheme Maharashtra 2023
Pingback: Maharashtra Lek Ladaki Yojana: मुलींना लखपती बनवणारी महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 - Govt Scheme Site
Pingback: PM Vishwakarma Scheme 2023: प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना - Govt Scheme Site
Pingback: MHADA Lottery Scheme 2024: म्हाडा ची लॉटरी सोडत आता 26 जानेवारी नंतरच…! - Govt Scheme Site
Pingback: UDID Card Registration 2024: अपंग प्रमाणपत्र अर्ज करणे | Unique Disability ID Swavlamban
Pingback: PM Suryodaya Scheme 2024: प्रधानमंत्री सूर्योदय योजना | एक कोटी घरांवर सौर यंत्रणेची घोषणा - Govt Scheme Site
Pingback: Mahabocw Registration 2024 | बांधकाम मजूर नोंदणी असा करावा ऑनलाईन अर्ज..! - Govt Scheme 2024